Monday, March 24, 2008

छक्कड.

मनी राणीले करी द्या हो माहिती
मना कलेजाले लागी गई बयती
जिवनीना मालले, पदरनी डाल
गोबय़्रा गोबय़्रा गालवर ,आकडीना बाल
रोज आर्धी रातले, उश्याना गातले ,
धरस मना हाथले, खोटं हुई ते विचारा
त्या दिवानी वातले,
धरे मना हाथले, सांगे मनी रातले
सांगु कसा बातले, तुम्ही तरी मानु नका
धर्म नी जातले,
मी समजु शकस तिनी कायपातले,
पण कोणी शिजु देवाले तयार नही दादा
मना खिचडीना भातले,
म्हणतस कोथमेर नी चव नही कांदानी पातले
जिवानीमा रामराम करना पडी दातले,
राणी व्हती जशी मनी रजपुती मेवा,
तुटेल दिलनी तिना कलेजामा दवा,
क्रुशनाना व्हट जसा रातदिन पवा,
राणी धायधाय रडे , राणी हाथपाय पडे,
शुकनी चांदनी जशी मावयती,
मना कलेजाले लागी गई बयती,
हाई कथा शे आजनी,ह्या मातेल समाजनी,
बिगर पांद्डाना पोकय पखवाजनी,
पोकय लाजनी, मुड्दाना साजनी, खानदानी बाजनी,
पण गरज शे दादा आज मना इलाजनी,
तेना धाकमा मनी राणीना लगननी,
नही पिपानी वाजनी,
कथा र्हाई गई अपुरी ह्या राजाना राजनी
तरी बी चहु मुलुक मा ति दंवडीसारखी गाजनी
तिना समाजनी आशी उगारी मुठ,
आणि मना समाजनी भी काडं पायन बूट,
तेस्नी देखी नंही कोणा ह्रिर्दानी लुट,
आणि हरिश्चंद्राना वचन ले भी करी टाकं झुट
ताटातुटमा प्रकाश , कसा व्हयना भकास,
आन्धारामा बईनी हयाती,
मना कलेजाले लागी गई बयती,
मनी राणीले करी द्या हो माहिती
मना कलेजाले लागी गई बयती

1 comments:

नितिज..... said...

जबरदस्त शे शेखर भाऊ... प्रकास सर काय लिवतस.... मजा यी ग्या...
शेखर दादा तुमन आभार मानो तितला कम शेतस....